प्रिय ताई, कशी आहेस ? तिकडे सगळे बरे आहेत ना ? माझ्याकडे तुला संपर्क साधण्यासाठी काही दुसरा मार्गच नाहिये. मी आज खुप मोठा झालोय पण तरिही माझ्याकडे तो भारीतला मोबाईल फोन नाहिये म्हणुन मी आज तुला तो वीडियो कॉल करतात ना, तो नाही करु शकलो. असं बोलतात की त्या वीडियो कॉल मधे माणुस हुबेहुब दिसतो... बरोबर आहे काय ?? मी तुला पाहुन खुप वर्ष उलटून गेली गं पण तुझा तो हसरा चेहरा आजही आठवतोय. तोच चेहरा जो लग्नाच्या दिवशी सासरी जाताना खुप रड्ला होता. तुला माझ्या डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणुन मी मंडपाच्या पाठिमागुण तुला बघत होतो. मला आठवतं ना, तू आलिशान गाडीत बसुन सासरी जात असताना मंडपातील सर्व नातेवाईकांचा निरोप घेता घेता मला शोधत होतीस. तुझा तो आतुरलेला चेहरा पाहुन मी स्वत: ला आवरु शकत नव्हतो म्हणुन मी तसाच लपुन राहिलो. तु रडता रडता आमच्या सगळ्यांचा निरोप घेतलास आणि पुन्हा तु घरी परतलीच नाहिस. तेच तुला शेवटचं पहिलेलं, पण आपली शेवटची आठवण म्हणजेच माझ्याकडे असलेला तो आपला लहानपणीचा आपला फोटो. आजही तो फोटो पाहिल्यास मी आपल्या लहानपणात रमून जातो. किती छान होतं ना आपलं छोटसं परिवार,...
अभियंता👷| लेखक✍️ | कवी❤️