Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

जबाबदार कोण ???

डोळ्यात पाणी हे थोड जास्तच होत.... किंचाळ्या कानी पडत होत्या, हळूहळू डोळ्यासमोर अंधार पडत होतं आणि बघता बघता पुर्ण आयुष्यच संपलं.... ही कहाणी आहे माझी. माझं नाव शालिनी, माझा जन्म झाला तेव्हा बाबांची परिस्तिती थोडी बिकट होती तरीसुद्धा बाबांनी मला खुप लाडात वाढवले. बाबा पेश्याने सुतार, आणि आई साधी गृहिणी. मला आजही आठवतं की माझ्या पहिल्या वाढदिवसाला बाबांनी मला एक छान बाहुली भेट म्हणुन घेउन दिली. ती बाहुली आज ही मी घेउन झोपते. काही दिवसातच सई आणि सुरेखा अश्या माझ्या नवीन मैत्रिणी झाल्या. मी त्यांच्यासोबत सतत खेळत असायची,असचं बघता बघता वर्षे उलटून गेली, आणि त्या शाळेत जाऊ लागल्या. त्यांना अभ्यासात मग्न असलेलं पाहुन माझं ही मन त्या पुस्तकात रमू लागला. मी बाबांकडे शाळेत जाण्याची जिद्द केली. लहानपणापासूनच बाबांची लाडकी असल्यामूळे बाबांनी मला शाळेत पाठवले. मग काय... रोज सकाळी उठायचं, शाळेत जायची तयारी करायची, आणि चालत चालत शाळेत जायचं. असच माझं सुंदर आयुष्य. याच आयुष्यात मी रमू लागलेली, नितिनियमाने अभ्यास करु लागली. मग काही दिवसातच माझ्या आयुष्यातील पहिली परिक्षा आली, मी खुप खु...