Skip to main content

ते हरवलेलं बालपण...


असं शांत निवांत बसलेलं असताना आपल्या सर्वांच्या मनात एक विचार येतो की ते बालपण कुठेतरी गेलं ? होय खरच ते हरवलेलं बालपण... आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण कुठेतरी ते बालपण विसरलो. बालपण म्हणजे काय हो? आहे तुमच्याकडे उत्तर ? माझ्याकडे आहे....

कुठेतरी मी असं ऐकलं होतं बालपणीचा काळ सुखाचा....खरोखरच बालपणीचा काळ हा किती सुखाचा असतो ना कारण आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ, ना काळजी, ना चिंता..!! बालपण म्हणजे फक्त मज्जा असे आपले समीकरण होते तर अश्याच बालपणाचा प्रारंभ होतो तो म्हणजे आपल्या घरापासून...घर म्हणजे त्या चार भिंतीत असलेलं आपला परिवार, कारण त्या परिवारशिवाय त्या घराला घर पण कधीच येत नाही. असचं हळू हळू आपल्या सगळ्यांना एक एक गोष्टी कळू लागतात. याच सगळ्यांमद्धे आपल्याला शाळा या शब्दाची ओळख करून दिली जाते. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या रडण्यापासुन ते स्वत: आपल्या मुखातून आलेल्या त्या चार ओळी...
"मज आवडते हि मनापासुनी शाळा, लाविते लळा हि जशी माऊली बाळा"
मग आली ती शाळेला जायची तयारी, त्यात अभ्यास अर्धा असला ती तेवढीच भीती, मग तो शिक्षकांकडून खाल्लेला मार, मग आला खुप सारा अभ्यास, खोड्या, धम्माल, लाड, कौतुक, खेळ, उनाडपणा, गंमतीजंमती आपल्या सर्वांना विचारांचे पंख लावून हळुच भूतकाळात नेऊन सोडतात, कसलं भारी होतं ना..!!

बालपण हे प्रत्येक व्यक्तीला एकदाच मिळते. म्हणून ते हवेहवेसे वाटते आणि सर्वजण बालपणीच्या आठवणी जपून ठेवतात. म्हणून म्हटले गेलं आहे की, “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” हे अगदी खरे आहे. ते आयुष्य म्हणजे खूप छान आणि गोड असते. जिथे स्वार्थाची भावना नसते, खोटेपणा नसतो, फसवेगिरी नसते आणि अभिमान सुद्धा नसतो. मात्र आता आपण सर्व मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं...

पण आजच्या या नव्या युगात ते बालपण कुठे हरवलंय का ?... होय खरच ते बालपण कुठे तरी हरवलं आहे. आपलं बालपण कितीही जपायचा प्रयत्न केला तरी ते हातून कधी निसटून जातं ते कळतच नाही. फक्त शरीर अन् मनाने मोठे होणारे आपण त्याचा आस्वाद घेणं कधीच विसरून गेलेलो असतो. आता.. मुलं ना बाहेर खेळत, ना घरात. करतात काय त्यांच मोबाईल व टिव्ही बस इतकंच विश्व.. एकत्र जरी बहिण भाऊ आले तरी ते..आपापल्या आई बाबांचे मोबाईल घेतात व बसतात खेळत... सगळी कडे बघितलं तर तेच चित्र, मुलं मोबाईल मधे गढलेली... मी असं नाही म्हणत की मी असं काहीच केला नाही पण या काळामद्धे आपण सर्वच गुंतून गेलो, मी सुद्धा...पण कधी तरी स्वत:हून वाटत ना की खुप गोष्टी मागे टाकून आपण या वेगळ्या जगात आलोय. मान्य आहे की काही वेळानंतर मुलं मोठी होतात पण कुठेतरी एक होती चिऊ… एक होता काऊ या सुंदर कवितेच्या जागी आताचे नविन गाणे गुणगुणत असतात, पेन्सिल ला कटर करणारे हात आता लिडपेन्सिलची लिड बदलत राहिलेत आणि बटण दाबू लागलेत, लपछपी चा डाव खेळता खेळता सगळे कायमचे लपुन गेलेत असा वाटू लागलय, उन्हाळ्याच्या सुट्टीत लुडो खेळणारी मुलं आज फोनमद्धे ऑनलाइन लुडो खेळत बसतात. पकडा-पकडी, आंधळी कोशिंबीर, तळ्यात-मळ्यात, खो-खो असे खेळ खेळणारे आपण कधी पबजी च्या युगात प्रदार्पन केला कळलंच नाही. टि.व्ही, मोबाइल, इंटरनेट मुळे मूलं या जगाचा आनंद घेवू शकत नाहीत. ती या जगापासुन, आपणां सर्वांपासुन दूर जावून मनोरंजनाच्या जगात जगतात. हिंसक सिरियल्स आणि हिंसक मोबाईल व व्हिडिओ गेम्स मुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, तणाव, एकटेपणा आणि हिंसक प्रवृती निर्माण होते. माझ्या हातात ही वेळच्या आधी मोबाइल आला पण आम्ही त्याचा उपयोग कुठेतरी चांगल्या कामांसाठी केला. तसंच जर या सर्वांचा दुरुपीयोग न होता एका चांगल्या कामासाठी झाला तर खुप चांगला होइल. आपल्या सगळ्यांच्याच काळात मोबाईल आले होते पण आपला आकर्षण हे थोड्या वेळासाठीच होतं.

आता आला तो पावसाळा, आपल्या सर्वांचा लाडका...
अजुन ही आठवतं, अचानक पाऊस येण आणि कागदाची नाव बनवून त्या वाहत्या पाण्यात सोडण, ती नाव जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तिचा पाठलाग करनं. आठवा ते कागदाची पतंग बनवणं आणि ती जोरदार वा-यात उडवणं. मी अशी कागदाची पतंग बनवून उडवली नाही पण तुमच्यातलच कोणी तरी असेल ना ? खरंच आपल बालपण किती मजेदार आणि आनंदायी होत. एक काळ होता जेंव्हा बालपण खेळण्या-खेळण्यात निघून जायच. बालपणात सोबती होत्या त्या खेळणी. आजही या बालपणीच्या आठवणी ताज्या आहेत आणि हा काळ आठवला तर परत पुन्हा-पुन्हा बालपण आयुष्यात यावेसे वाटते. मात्र गल्लीतील तो मुलांचा आवाज कुठे तरी हरवून गेलाय... आज मी पाहतो तर लहान-लहान मुलांना ते दप्तराचा ओझं झेपत नाही, एकदम भरलेली स्कुल बस मी सकाळी बघतो, आता तर त्या मुलांना आराम भेटलाय कारण कोरोना च्या या महामारी मधे सगळ्या शाळा बंद आहेत. तरी सुद्धा काही शाळांनी आता ई-लर्नींग सुरु केलीये कारण विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडला नाही पाहिजे. मी असं नाही म्हणत की काळाच्या सोबत आपल्यात बदल नाही झाले पहिजेत, माझा म्हणणं आहे की झाले पाहीजेत पण त्याच ई-लर्नींग मधे त्या मुलांना शाळेसारखी मज्जा येईल का ? शाळेच्या पहिल्या दिवशी आपण जेवढे रडतो ना तीच शाळा सोडताना आपल्या डोळ्यात पाणी येता. कारण आपल्या जन्मापासुन ते आपल्या शाळेपर्यंतचा काळ म्हणजे ते बालपण....

तेच बालपण, त्याच जुन्या आठवणी सोडून कसं चालेल ? खरोखर आपण या बद्द्ल विचार केला पाहिजे... बरोबर ना ??

Comments

Popular posts from this blog

पत्र लाडक्या ताईस...📝

प्रिय ताई,  कशी आहेस ? तिकडे सगळे बरे आहेत ना ? माझ्याकडे तुला संपर्क साधण्यासाठी काही दुसरा मार्गच नाहिये. मी आज खुप मोठा झालोय पण तरिही माझ्याकडे तो भारीतला मोबाईल फोन नाहिये म्हणुन मी आज तुला तो वीडियो कॉल करतात ना, तो नाही करु शकलो. असं बोलतात की त्या वीडियो कॉल मधे माणुस हुबेहुब दिसतो... बरोबर आहे काय ?? मी तुला पाहुन खुप वर्ष उलटून गेली गं पण तुझा तो हसरा चेहरा आजही आठवतोय. तोच चेहरा जो लग्नाच्या दिवशी सासरी जाताना खुप रड्ला होता. तुला माझ्या डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणुन मी मंडपाच्या पाठिमागुण तुला बघत होतो. मला आठवतं ना, तू आलिशान गाडीत बसुन सासरी जात असताना मंडपातील सर्व नातेवाईकांचा निरोप घेता घेता मला शोधत होतीस. तुझा तो आतुरलेला चेहरा पाहुन मी स्वत: ला आवरु शकत नव्हतो म्हणुन मी तसाच लपुन राहिलो. तु रडता रडता आमच्या सगळ्यांचा निरोप घेतलास आणि पुन्हा तु घरी परतलीच नाहिस. तेच तुला शेवटचं पहिलेलं, पण आपली शेवटची आठवण म्हणजेच माझ्याकडे असलेला तो आपला लहानपणीचा आपला फोटो. आजही तो फोटो पाहिल्यास मी आपल्या लहानपणात रमून जातो. किती छान होतं ना आपलं छोटसं परिवार,...

छंद...

छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु  शोध आता थांबला... सहवास आपल्या दोघांचा नव्या नात्यानी रंगला, स्पर्श तुझा होऊनी वेडा हा प्रेम रंगात दंगला. छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु  शोध आता थांबला... प्रेम गंध तुझा मला हळुच सतावू लागला, छंदामुळे तुझा हा प्रियकर  वेगळ्या मोहात मोहु लागला. छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु  शोध आता थांबला... -अंकित गायकर

Depression (नैराश्य)

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, आज मला तुमच्या समोर येउन 3 दिवस झाले, तुम्हाला आठवतं की ज्या विषयाने मी सुरुवात केलेली म्हणजेच Positivity (सकारात्मकता) आज मी त्याच विषयासंबधी काहितरी तुमच्या समोर मांडणार आहे... Positivity या विषयाबद्दलचा माझा मत तर तुम्हाला कळलं च असेल, राहिला प्रश्न तो म्हणजे Depression . हा विषय निवडण्यापुर्वी मी Depression ची व्याख्या शोधत होतो पण माझ्या मनाला पटेल असं काही भेटलच नाही पण मी खुप वेळ याबद्दल विचार केला आणि मग मनाला जे जे वाटत गेलं ते ते लिहत गेलो... Depression म्हणजे काय ? Depression म्हणजे उदासपणा. ही आपल्या मनाची अशी अवस्था आहे ज्यात आपल्याला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. मी काही शोध घेतला तेव्हा कळलं की जगात २० ते ३० टक्के व्यक्ती हे Depression मधे जातात. Depression का येतं ? एखाद्या दुर्दैवी प्रसंगामुळे, दारू किंवा दुसरे व्यसन असल्यास आपण Depression मध्ये जाऊ शकतो मात्र काही कारण नसताना सुद्धा मेंदूतील काही बदलामुळे Depression येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर, नेहमीच्या ज...