छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु शोध आता थांबला... सहवास आपल्या दोघांचा नव्या नात्यानी रंगला, स्पर्श तुझा होऊनी वेडा हा प्रेम रंगात दंगला. छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु शोध आता थांबला... प्रेम गंध तुझा मला हळुच सतावू लागला, छंदामुळे तुझा हा प्रियकर वेगळ्या मोहात मोहु लागला. छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु शोध आता थांबला... -अंकित गायकर
अभियंता👷| लेखक✍️ | कवी❤️