Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

पत्र लाडक्या ताईस...📝

प्रिय ताई,  कशी आहेस ? तिकडे सगळे बरे आहेत ना ? माझ्याकडे तुला संपर्क साधण्यासाठी काही दुसरा मार्गच नाहिये. मी आज खुप मोठा झालोय पण तरिही माझ्याकडे तो भारीतला मोबाईल फोन नाहिये म्हणुन मी आज तुला तो वीडियो कॉल करतात ना, तो नाही करु शकलो. असं बोलतात की त्या वीडियो कॉल मधे माणुस हुबेहुब दिसतो... बरोबर आहे काय ?? मी तुला पाहुन खुप वर्ष उलटून गेली गं पण तुझा तो हसरा चेहरा आजही आठवतोय. तोच चेहरा जो लग्नाच्या दिवशी सासरी जाताना खुप रड्ला होता. तुला माझ्या डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणुन मी मंडपाच्या पाठिमागुण तुला बघत होतो. मला आठवतं ना, तू आलिशान गाडीत बसुन सासरी जात असताना मंडपातील सर्व नातेवाईकांचा निरोप घेता घेता मला शोधत होतीस. तुझा तो आतुरलेला चेहरा पाहुन मी स्वत: ला आवरु शकत नव्हतो म्हणुन मी तसाच लपुन राहिलो. तु रडता रडता आमच्या सगळ्यांचा निरोप घेतलास आणि पुन्हा तु घरी परतलीच नाहिस. तेच तुला शेवटचं पहिलेलं, पण आपली शेवटची आठवण म्हणजेच माझ्याकडे असलेला तो आपला लहानपणीचा आपला फोटो. आजही तो फोटो पाहिल्यास मी आपल्या लहानपणात रमून जातो. किती छान होतं ना आपलं छोटसं परिवार,...

आपली मुंबई...स्वप्नसुंदरी

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, लिहायची आवड तर लहानपणापासूनच होती पण माझ्या त्या आवडीला वाव मिळाला तो म्हणजे २०१७ साली. ज्ञानप्रसारिनी शाळेने सुवर्णवर्षा नंतर एक नवी संकल्पना सुरु केली. पण इयत्ता १० वीत असताना आमच्या शाळेने काही विद्यार्थ्यांना ' ज्ञानप्रसारिनी स्मरणिका २०१७ ' साठी विविध प्रकारचे लेख, कविता आणि विनोद लिहायला सांगितले. त्यावेळी लिहिण्यासाठी खुप काही विचार केला नाही, पण काही माहिती काढल्यानंतर मी एक विषय निवडला. तो म्हणजे ' आपली मुंबई...स्वप्नसुंदरी ' 'ज्ञानप्रसारिनी स्मरणिका २०१७' च्या पृष्ठ क्रमांक ८६ वरील हा माझा लेख... आपली मुंबई...स्वप्नसुंदरी आज भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली आहेत. आपण आता ७० व्या स्वातंत्र्य वर्षाकडे वाटचाल करत आहोत. १५० वर्षे राज्य करून गेलेले इंगज म्हणजे ब्रिटिश सरकार आपल्यावर अनेक जुलुम करून गेले. पण १८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशाद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली ती म्हणजे मुंबई १९ व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळी चा पाया मुंबईतच मजबूत झाल...

वक्त बुरा है... गुजर जाएगा

वक्त बुरा है... गुजर जाएगा, आज अंधेरा आया है तो कल उजाला लाएगा । दुनिया मैं बहुत फिसलन है तु फिसल जाएगा जल्दी उठना सिखले तभी तो कामयाब बन पाएगा । कर मेहनत सच्चे दिलसे तू संभल जाएगा, यही खुशियाँ लेकर तु चेहरे पर हसीं लाएगा। वक्त बुरा है... गुजर जाएगा, आज अंधेरा आया है तो कल उजाला लाएगा । इस मेहनत से ही तु दो वक्त की रोटी खाएगा, अगर ये कुछ नही मिल पाया तो भूखा मर जाएगा । तु कोशिश कर ,नही तो हौसला टूट जाएगा, इस राह पर रुक गया तो खुद को रोता हुआ पाएगा । वक्त बुरा है... गुजर जाएगा, आज अंधेरा आया है तो कल उजाला लाएगा । ये तो बुरे समय की बात हैं...वो भी बीत जाएगा एकदिन ऐसे बिना बताये वो ढेर सारी खुशियाँ लाएगा । जिस दीन दुख का सामना करना सिख जाएगा उसदिन गर्व से खुद के अंदर की शक्ती पायेगा । वक्त बुरा है... गुजर जाएगा, आज अंधेरा आया है तो कल उजाला लाएगा । ये मुश्किले, ये डर एकदिन चला जाएगा जब खुद के अंदर जीत की उम्मीद तु लाएगा । आखें खोल अपने अंदर झाँक... तुझे कुछ तो नजर आएगा, ऐसेही एक ना एक दिन तु खुद को जान पाएगा । तेरी हर एक खुशी एक नया सवेरा तूही लाए...

Depression (नैराश्य)

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, आज मला तुमच्या समोर येउन 3 दिवस झाले, तुम्हाला आठवतं की ज्या विषयाने मी सुरुवात केलेली म्हणजेच Positivity (सकारात्मकता) आज मी त्याच विषयासंबधी काहितरी तुमच्या समोर मांडणार आहे... Positivity या विषयाबद्दलचा माझा मत तर तुम्हाला कळलं च असेल, राहिला प्रश्न तो म्हणजे Depression . हा विषय निवडण्यापुर्वी मी Depression ची व्याख्या शोधत होतो पण माझ्या मनाला पटेल असं काही भेटलच नाही पण मी खुप वेळ याबद्दल विचार केला आणि मग मनाला जे जे वाटत गेलं ते ते लिहत गेलो... Depression म्हणजे काय ? Depression म्हणजे उदासपणा. ही आपल्या मनाची अशी अवस्था आहे ज्यात आपल्याला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. मी काही शोध घेतला तेव्हा कळलं की जगात २० ते ३० टक्के व्यक्ती हे Depression मधे जातात. Depression का येतं ? एखाद्या दुर्दैवी प्रसंगामुळे, दारू किंवा दुसरे व्यसन असल्यास आपण Depression मध्ये जाऊ शकतो मात्र काही कारण नसताना सुद्धा मेंदूतील काही बदलामुळे Depression येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर, नेहमीच्या ज...

ते हरवलेलं बालपण...

असं शांत निवांत बसलेलं असताना आपल्या सर्वांच्या मनात एक विचार येतो की ते बालपण कुठेतरी गेलं ? होय खरच ते हरवलेलं बालपण... आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण कुठेतरी ते बालपण विसरलो. बालपण म्हणजे काय हो? आहे तुमच्याकडे उत्तर ? माझ्याकडे आहे.... कुठेतरी मी असं ऐकलं होतं बालपणीचा काळ सुखाचा....खरोखरच बालपणीचा काळ हा किती सुखाचा असतो ना कारण आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ, ना काळजी, ना चिंता..!! बालपण म्हणजे फक्त मज्जा असे आपले समीकरण होते तर अश्याच बालपणाचा प्रारंभ होतो तो म्हणजे आपल्या घरापासून...घर म्हणजे त्या चार भिंतीत असलेलं आपला परिवार, कारण त्या परिवारशिवाय त्या घराला घर पण कधीच येत नाही. असचं हळू हळू आपल्या सगळ्यांना एक एक गोष्टी कळू लागतात. याच सगळ्यांमद्धे आपल्याला शाळा या शब्दाची ओळख करून दिली जाते. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या रडण्यापासुन ते स्वत: आपल्या मुखातून आलेल्या त्या चार ओळी... "मज आवडते हि मनापासुनी शाळा, लाविते लळा हि जशी माऊली बाळा" मग आली ती शाळेला जायची तयारी, त्यात अभ्यास अर्धा असला ती तेवढीच भीती, मग तो शिक्षकांकडून खाल्लेला मार, मग आला खुप ...

Positivity

हा Lockdown आपल्याला काय काय करायला लावणार आहे काय माहित...घरात बसुन राहणे हे आपल्याला कधीच पटले नाही आणि ते पटणार ही नाही. पण सध्या त्या शिवाय आपल्या कडे दुसरा पर्याय नाही. आपल्या देशात कोरोना आला तेव्हा सगळ्यांनी या रोगाला Avoid केला पण दिवसेंदिवस तो रोग पसरत गेला आणि महामारी मधे रुपांतर करत गेला. या Lockdown मुळे खुप काही त्रास झाला आहे आणि मला सुद्धा झाला. शेवटी मला कुठेतरी असं वाटतं की आता हातावर हात ठेवून चालणार नाही, म्हणून आता इथे एका वेगळ्या रुपात तुमच्या समोर आलो. आणि मी एकटाच नाहिये असा की एका वेगळ्या रुपात आलोय. तुम्ही ही तुमचे छंद जोपासू शकता, आपल्यात अशेही काही आहेत की ज्यांना प्रत्यक्षात त्यांचे छंद, त्यांची आवड जोपासायचा एक Chance भेटला व ते हे सर्व आवडीने करतात नमस्कार !! मी अंकित नरेश गायकर , 117 दिवसांनंतर तुमच्या समोर अश्या वेगळ्या रुपात आलेला...मी कोणी मोठा लेखक नाहिये पण लिहायची आवड ही बालपणापासुन, लेखक नसलो तरी मी या देशांचा एक भावी Engineer, आणि आज मी जो विचार तुमच्या समोर घेउन आलोय तो म्हणजे...Postivity Positivity means thinking in an optimisti...