Skip to main content

पत्र लाडक्या ताईस...📝

प्रिय ताई, 
कशी आहेस ? तिकडे सगळे बरे आहेत ना ? माझ्याकडे तुला संपर्क साधण्यासाठी काही दुसरा मार्गच नाहिये. मी आज खुप मोठा झालोय पण तरिही माझ्याकडे तो भारीतला मोबाईल फोन नाहिये म्हणुन मी आज तुला तो वीडियो कॉल करतात ना, तो नाही करु शकलो. असं बोलतात की त्या वीडियो कॉल मधे माणुस हुबेहुब दिसतो... बरोबर आहे काय ?? मी तुला पाहुन खुप वर्ष उलटून गेली गं पण तुझा तो हसरा चेहरा आजही आठवतोय. तोच चेहरा जो लग्नाच्या दिवशी सासरी जाताना खुप रड्ला होता. तुला माझ्या डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणुन मी मंडपाच्या पाठिमागुण तुला बघत होतो. मला आठवतं ना, तू आलिशान गाडीत बसुन सासरी जात असताना मंडपातील सर्व नातेवाईकांचा निरोप घेता घेता मला शोधत होतीस. तुझा तो आतुरलेला चेहरा पाहुन मी स्वत: ला आवरु शकत नव्हतो म्हणुन मी तसाच लपुन राहिलो. तु रडता रडता आमच्या सगळ्यांचा निरोप घेतलास आणि पुन्हा तु घरी परतलीच नाहिस.

तेच तुला शेवटचं पहिलेलं, पण आपली शेवटची आठवण म्हणजेच माझ्याकडे असलेला तो आपला लहानपणीचा आपला फोटो. आजही तो फोटो पाहिल्यास मी आपल्या लहानपणात रमून जातो. किती छान होतं ना आपलं छोटसं परिवार, आज त्या फ़ोटोला खुप वर्ष झाले. मध्यकाळी आपल्या गावात पूर आलेला आणि पुरात खुप जण मेले, कुणी हरवले आणि खुप हानी झाली. आणि मला हे सांगायला खुप दुःख वाटत आहे की त्या आलेल्या पुरात आपले आई-बाबा हरवून गेले. मी त्यांना खुप शोधलं ग पण ते सापडलेच नाही. आपल्याकडे असलेली 12 एकर जमीन पण उध्वस्त झाली ग तसंच आपला वाडा, आपला गोठा, बघता बघता आपलं संपुर्ण अस्तित्व च नाहिसं झाला गं. तो माझ्या आयुष्यातला काळा दिवस होता. अजुन ही ते दृश्य डोळ्यासमोर आलं की डोळे पाणवतात. जवळ जवळ मी त्यांना शोधता शोधता आज 45 वर्षाचा झालोय ग पण आई बाबा काही सापडले नाही. 

त्या प्रसंगानंतर आम्हाला सरकार कडून काही मदत मिळाली पण 2 वर्ष नंतर गावालगत बांधलेली झोपडी पण हटवण्यात आली. आणि मी रस्त्यावर आलो. 5 महिन्यांपुर्वी आपल्याकडे तो कोरोना आला. आणि बघता बघता तो पसरत गेला. काय म्हणे तर त्या कोरोना मुळे संचारबंदी लागली का लॉक्क्कडाउन लागला, मला तर ते बोलतापण येत नाय. पण मी, पोटाला कैची बसली म्हणुन खाण्याच्या शोधात फिरत होतो. त्यामुळे खुप पोलिसांचा मार ही खाल्ला, पण काही पोलिस खुप चांगले होते त्यांनी खायला घेउन दिलं. असच दिवसेंदिवस चालू राहिलं पण काही दिवसानंतर माझी तब्येत बिघडली. म्हणुन काही दिवस झाडाच्या आडोशाला राहत होतो. आणि एक दिवस माझं आजारपण मला सतावू लागलं. नंतर मला एक झाडाच्या बाजुला एक घर दिसलं, मग त्यातला एक मुलगा अभ्यास करत होता. मी त्याच्याकडून काही पान आणि पेन घेतला, आणि लिहित गेलो.

हे पत्र लिहिताना, ते आपल्याला शाळेत असताना शिकवलेल ना तसं लिहिणार होतो. पत्र लिहिण्यास कारण की... पण विषय वैगरे लिहिण्याची ही वेळ नाहीये... आज मला या आजारपणात येऊन 7 दिवस झालेत खुप अस्वस्थ वाटतयं मी ते झाड सोडून 3 दिवस उलटून गेलेत. आणि मी





हा ते मी मधेच गायब झालेलो कारण मी आता दवाखान्यात आहे. कुठल्या ते माहित नाही, पण इकडे माझ्यासारखेच काही पेशंट आहेत. त्यांनाही माझ्यासारखच आजार आहे. माझी परिस्थिति आता थोडी बरी आहे म्हणुन तर हे पत्र मी पुन्हा लिहू लागलोय. मी इथे किती दिवसांपासून आहे ते माहित नाही, आता थोड्यावेळा पुर्वी डॉक्टर आलेले ते म्हणाले की मला कोरोना झालाय. मला त्याच दुःख नाहिये, कारण या जगात आता माझं कोणीच नाहिये. मग जगायचं कशासाठी... तु गेल्यानंतर या जगात माझं फक्त आई बाबा होते, आणि आता ते पण माझ्यापासून दूर झालेत. मला या रोगापासून आता वाचवून ठेवलय ते म्हणजे तुझ्या प्रेमाने कारण आता तुच आहेस माझ्या आयुष्यात एकटी पण सतत एकच खंत वाटत राहिल की तुला पाहता नाही आलं. अरे विसरलोच त्या लहानग्याने मला 2 च पानं दिलेली म्हणुन मी आता मुद्द्याच बोलतो येत्या 3 तारखेला, आपला सण येतोय म्हणजेच....रक्षाबंधन. याच दिवशी आपल्या लहानपणापासून तू न चुकता मला राखी बांधायची. किती भारी असायचं ना सगळचं खुप तयारी करायचो, सगळे नटून बसायचो, एकत्र सण साजरी करायचो. पण त्या सगळ्या जुन्या आठवणी, त्याच आठवणी मध्ये रमलो की आजही खुप भारी वाटतं. पण यावर्षीची रक्षाबंधन ही माझी शेवटची असेल असं वाटतयं. मला नाही वाटतं की या रोगाने मला काही होईल पण कुठे तरी माझं शरीर आता थकत चाललंय. हे पत्र तुझ्या पर्यंत पोहचेल का नाही हे माहित नाही कारण पत्र लिहिता लिहिता लक्षात आलं की मला तर तुझा पत्ता माहितच नाहिये. हा पण तुझ्या लग्नाच्या वेळी मी कुठेतरी तुझ्या घरचा पत्ता एकलेलं

मुंबई...

Comments

  1. अप्रतीम लेख वाचून खूप छान वाटलं.....🤩☹

    ReplyDelete
  2. Khup ch chan bhava..
    Ekdam mast

    ReplyDelete
  3. अप्रतिम लेख 🥰

    ReplyDelete
  4. The love between a bro & a sis that is true love🥰👍
    #Peacefulpoetry

    ReplyDelete
  5. He vachun ti tuzy prematch padli re

    ReplyDelete
  6. Khup ch chan dada ....

    ReplyDelete
  7. Nice ����

    ReplyDelete

Post a Comment

आपण दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार...🙏🏻
Thank You for Valuable Response 🥰

Popular posts from this blog

छंद...

छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु  शोध आता थांबला... सहवास आपल्या दोघांचा नव्या नात्यानी रंगला, स्पर्श तुझा होऊनी वेडा हा प्रेम रंगात दंगला. छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु  शोध आता थांबला... प्रेम गंध तुझा मला हळुच सतावू लागला, छंदामुळे तुझा हा प्रियकर  वेगळ्या मोहात मोहु लागला. छंद मला तुझा हा नवा लागला, प्रश्न मी उत्तर तु  शोध आता थांबला... -अंकित गायकर

Depression (नैराश्य)

नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो, आज मला तुमच्या समोर येउन 3 दिवस झाले, तुम्हाला आठवतं की ज्या विषयाने मी सुरुवात केलेली म्हणजेच Positivity (सकारात्मकता) आज मी त्याच विषयासंबधी काहितरी तुमच्या समोर मांडणार आहे... Positivity या विषयाबद्दलचा माझा मत तर तुम्हाला कळलं च असेल, राहिला प्रश्न तो म्हणजे Depression . हा विषय निवडण्यापुर्वी मी Depression ची व्याख्या शोधत होतो पण माझ्या मनाला पटेल असं काही भेटलच नाही पण मी खुप वेळ याबद्दल विचार केला आणि मग मनाला जे जे वाटत गेलं ते ते लिहत गेलो... Depression म्हणजे काय ? Depression म्हणजे उदासपणा. ही आपल्या मनाची अशी अवस्था आहे ज्यात आपल्याला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. मी काही शोध घेतला तेव्हा कळलं की जगात २० ते ३० टक्के व्यक्ती हे Depression मधे जातात. Depression का येतं ? एखाद्या दुर्दैवी प्रसंगामुळे, दारू किंवा दुसरे व्यसन असल्यास आपण Depression मध्ये जाऊ शकतो मात्र काही कारण नसताना सुद्धा मेंदूतील काही बदलामुळे Depression येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर, नेहमीच्या ज...